विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे जलद आणि टिकाऊ पध्दतीने मुजविण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पॅचवर्कचा प्रयाेग करण्यात येत आहे. दाब संवेदनशील साहित्याद्वारे हाेणाèया या पॅचवर्क कामाचे प्रात्यक्षिक गुरुवारी गावभागातील जुना फडणीस हाैद चाैकात घेण्यात आले. आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आयुक्त पल्लवी पाटील आदींनी या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध भागातील रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आणि आगामी गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने रस्ते पॅचवर्कसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या संकल्पनेतून या अत्याधुनिक पॅचवर्क पध्दतीचा प्रत्यक्ष डेमाे दाखविण्यात आला.
लवकरच गणेशाेत्सवाला सुरुवात हाेत हाेऊन शहरातील मुख्य मार्गावर पडलेले खड्डे मुजवून हा उत्सव खड्डेमुक्त करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इन्स्टा राेड पॅचरमध्ये दाब संवेदनशील साहित्याचा वापर केला जात असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे काही मिनिटांत मुजविणे शक्य हाेते.
या पद्धतीसाठी ट्रक, डंपर किंवा माेठ्या राेलरसारख्या अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता नसल्याने कमी मनुष्यबळात रस्ते दुरुस्तीचे काम करून रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला हाेताे. रस्ता थंड हाेण्याची प्रतीक्षा करावीच लागत नाही. एका खड्ड्याच्या पॅचवर्कसाठी अवघा दहा मिनिटांचा कालावधी लागताे. दुरुस्ती किमान एक वर्षे टिकण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये असल्याने वारंवार हाेणाèया रस्ते दुरुस्तीचा खर्च कमी हाेण्यास मदत हाेऊ शकते.
पारंपरिक पद्धतीने केलेल्या पॅचवर्कनंतर काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात असल्यामुळे आधुनिक पध्दतीने रस्त्यांच्या टिकाऊपणासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. या माध्यमातून गणेश चतुर्दशीपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवून ‘खड्डेमुक्त इचलकरंजी’ करण्यात येणार असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले.
यावेळी सभागृह नेते विठ्ठल चाेपडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापाैर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतिश मुळीक, नगरसेविका साै. विद्या साळुंखे, साै. अरुणा बचाटे, प्रभाग समिती अध्यक्ष सुशांत कलागते, रवी रजपुते, याेगेश पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा, राहुल घाट, अनिकेत पाटील आदींसह मान्यवर व नागरिक उपस्थित हाेते.
