शहरातील जेय वैद्यकिय कचरा संकलन व प्रक्रिया कामाचा ठेका रद्द केल्याचे सांगूनही कचरा गोळा करण्याचे काम करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एस. एस. सर्व्हिसेस फर्मचे मालक सागर बाजीराव जाधव व आशिष विलासराव घाटगे (दोघे रा. कसबा बावड़ा) या दोघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात महापालिका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी महापालिकेच्या वतीने शहरातील जैववैद्यकिय कचरा संकलन व प्रक्रिया कामाचा ठेका एस. एस. सर्विसिस फर्मबांना देण्यात आला होता. परंतु १० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती बैठकीतील ठरावानुसार एस. एस. सर्विस यांचा हा ठेका, करारनामा रद्द करण्यात आला. त्याचबरोबर वा कामाचा ठेका श्री गोविंद बायोमेडीकल प्रा. लि. चे नुतन आप्पासो जाधव यांच्या फर्मला देण्यात आले. या संदर्भात सागर जाधव आगि आशिष घाटगे या दोघांनाही पत्र व नोटीसीद्वारे कळविण्यात आले होते. तर १७ ऑगस्टपासून श्री गोविंद बायोमेडीकल फर्मद्वारे शहरातील जैव वैद्यकिय कचरा संकलन व प्रक्रिया काम सुरु करण्यात आले. काम बंद करण्याबाबत सांगूनही एस. एस. सर्विसिस यांच्याकडून १७ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सदरचा कचरा गोळा करण्याचे काम केले गेले.
