शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २ कोटी २५ लाख ५७ हजार ९७२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहसीन कादर मणेर याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आणखी चार दिवसांची वाढ केली. दरम्यान, तपासात मणेर याच्या कार्यालयात नोकरी करणारा मुदस्सर जमीर मकानदार (वय २६, रा. इंदिरानगर, इचलकरंजी) हा आणखी एक आरोपी निष्पत्र झाला असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मकानदारला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
तपासादरम्यान पोलिसांनी मणेरच्या कार्यालयातून गुंतवणूकदारांशी केलेली तब्बल ४५६ करारपत्रे जाम केली आहेत. मणेरला अटक झाल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या तक्रारदारांची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रांग लागली. आतापर्यंत सुमारे १२ नव्या तक्रारदारांनी २२ लाख रुपयांच्या फसवणुकीची माहिती दिल्याने प्रकरणातील फसवणुकीची रक्कम आणखी वाढली आहे. गुंतवणूकदारांकडून उकळलेली रकम शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे.
