Homeमहाराष्ट्रदहीहंडीमधील डान्समुळे राधा पाटील अडचणीत, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

दहीहंडीमधील डान्समुळे राधा पाटील अडचणीत, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात लावणी सादर करताना अश्लील नृत्य होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह दहीहंडी मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकाविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कलाकारांकडून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याने पोलिसांनी कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. त्यानंतरही कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप आहे.

 

या प्रकरणी लावणी नृत्यांगणा राधा पाटील, एम्पायर ग्रुप ए. के. बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या निदर्शनास आलेल्या गोष्टी

 

मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह लावणीचे सादरीकरण करण्यात येणार होते. कार्यक्रमादरम्यान अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्य सादर होऊ नये, यासाठी प्रशासनाने संबंधित आयोजकांना काही अटी घातल्या होत्या. त्यामध्ये कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे ही महत्त्वाची अट होती.

 

या अटींची पूर्तता करण्यासाठी आयोजकांकडे आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची मागणी करण्यात आली होती. मात्र, मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे किंवा आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

 

त्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी संबंधित दहीहंडी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. कार्यक्रमासाठी परवानगी नसतानाही तो आयोजित करून त्यात लावणीचे सादरीकरण करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी राधा पाटील, मंडळाचे अध्यक्ष भूषण सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरोधात कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -