देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने लाखो ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने सप्टेंबर महिन्यासाठी आपल्या कर्जाच्या व्याजदरांमध्ये (MCLR) कपात केली आहे.
बँकेच्या या निर्णयामुळे आता होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांवरील व्याजाचा बोजा कमी होणार आहे. त्यांचा मासिक ईएमआय (EMI) देखील कमी होणार आहे. बँकेचे हे नवीन दर लागू झाले आहेत.
सणासुदीच्या काळात एचडीएफसी बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांसोबतच ज्यांचे आधीच कर्ज सुरू आहे, त्या ग्राहकांनाही आर्थिक फायदा होणार आहे. आज एचडीएफसीने MCLR कपात करण्याचा निर्णय घेतला. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी MCLR दरांमध्ये ५ ते १० बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. या बदलानंतर बँकेचे MCLR दर आता ७.९०% ते ८.६०% च्या दरम्यान झाले आहेत. याआधी हे दर ८% ते ८.६५% च्या दरम्यान होते. पण याचा थेट लाभ केवळ त्या ग्राहकांनाच मिळेल ज्यांच्या कर्जाचा व्याजदर MCLR शी जोडलेला आहे.
एचडीएफसी बँकेने ओव्हरनाइट एमसीएलआर (MCLR) ८% वरून ७.९०% पर्यंत कमी केला आहे. एक महिन्याचा एमसीएलआर (MCLR) देखील ८% वरून ७.९०% पर्यंत कमी करण्यात आला आहे. ३ महिन्यांच्या कालावधीसाठीचा दर ८.१५% वरून ८.०५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. ६ महिन्यांचा एमसीएलआर (MCLR) ८.३०% वरून ८.२५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. १ वर्षाचा एमसीएलआर (MCLR) आता ८.४०% ऐवजी ८.३५% असेल. सर्वात मोठी कपात २ वर्षांच्या कालावधीत करण्यात आली आहे, जिथे दर ८.५५% वरून ८.४५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. ३-वर्षांचा एमसीएलआर (MCLR) देखील ८.६५% वरून ८.६०% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR हा बँकेचा असा किमान व्याजदर असतो, ज्याच्या खाली जाऊन कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पारदर्शकता आणण्यासाठी एप्रिल २०१६ मध्ये ही प्रणाली लागू केली.
तुमचा प्रत्यक्ष कर्जाचा व्याजदर हा केवळ MCLR वर अवलंबून नाही. तर कर्जाचा प्रकार, बँकेचा स्प्रेड (Spread) आणि ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरसारख्या इतर घटकांवरही ठरतो.
MCLR कपातीचा तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
MCLR मध्ये कपात झाल्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळतो. पण तुमच्या EMI मधील कपात खालील गोष्टींवर आहे.
कर्जाचा रीसेट कालावधी कधी येतो.
तुमचे कर्ज जुन्या बेस रेटशी जोडलेले आहे की नवीन MCLR/EBLR शी.
HDFC बँकेचे इतर महत्त्वाचे व्याजदर (२४ जून २०२६ पासून लागू):
बेस रेट (Base Rate): ८.७०%
BPLR (Benchmark Prime Lending Rate): १७.२०% प्रतिवर्ष
HDFC बँक FD (फिक्स डिपॉझिट) व्याजदर:
सर्वसामान्य नागरिक: २.७५% ते ६.५०%
ज्येष्ठ नागरिक: ३.२५% ते ७.००%
