Homeमहाराष्ट्रBigg Boss ला टक्कर द्यायला येतोय अनिल कपूरचा झक्कास शो! पहिल्या प्रोमोनेच...

Bigg Boss ला टक्कर द्यायला येतोय अनिल कपूरचा झक्कास शो! पहिल्या प्रोमोनेच इंटरनेटवर उडवला धुरळा

सध्या टीव्ही विश्वात एकाच शोची हवा पाहायला मिळतेय, ते म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसचं २० वं सीझन. नुकताच या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडला असून शोची अधिकृत सुरूवात झाली आहे.

 

एका बाजूला बिग बॉसचा धुमाकूळ सुरू असतानाच, दुसरीकडे बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारने दंड थोपटले आहेत. हा सुपरस्टार दुसरा कोणी नसून खुद्द अनिल कपूर आहेत.

 

लवकरच अनिल कपूर होस्टच्या भूमिकेत दिसणार असून त्यांचा शो India Ke Top 1% – The Anil Kapoor Show या धमाकेदार रिॲलिटी गेम शोचा पहिलावहिला टिझर समोर आला आहे. टीझर समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

१०० खेळाडू अन् २६ कोटींचा खजिना

 

 

स्टार प्लस चॅनेलने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या शोचा धमाकेदार प्रोमो रिलीज केला आहे. या शोचे स्वरूप कोणत्याही सामान्य क्वीझ गेमसारखे नसून, देशातील सर्वात हुशार लोकांच्या बुद्धीमत्तेचा कस लागणार आहे. या गेम शोमध्ये एकाच वेळी स्टेजवर १०० खेळाडू आमनेसामने उभे ठाकणार असून विजेत्याला तब्बल २६ कोटी रुपयांची मोठी बक्षीस रक्कम मिळणार आहे.

 

14 व्या वर्षी लग्न, घरकाम करून भरलं पोट! इंडस्ट्रीची बोल्ड सुपरस्टार, प्रेमामुळे झाली बरबाद, पार्टनरनेच लावला चुना

अनिल कपूरच्या स्वॅगच्या प्रेमात पडले प्रेक्षक

 

 

चार दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अनिल कपूर यांचा उत्साह आजही भन्नाट आहे. यापूर्वी त्यांनी ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ चे सूत्रसंचालन करून रिॲलिटी विश्वात आपली एक वेगळी छाप पाडली होती. आता पुन्हा एकदा त्यांचा तोच झक्कास अंदाज, या शोमधून पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये त्यांचा जबरदस्त वावर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, हा शो टीआरपीमध्ये कोणते स्थान मिळवणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

कधी आणि कुठे पाहता येणार शो?

 

 

‘इंडिया के टॉप १%’ या शोचा ग्रँड प्रीमियर येत्या १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता स्टार प्लसवर पार पडणार आहे. टेलिव्हिजनसोबतच हा शो जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांसाठी २४ तास उपलब्ध असणार आहे. सलमानच्या ‘बिग बॉस’ला हा शो नक्कीच तगडी टक्कर देणार असल्याचं म्हटलं जातंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -