Homeइचलकरंजीइचलकरंजी पती-पत्नीला मारहाण चौघांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी पती-पत्नीला मारहाण चौघांवर गुन्हा दाखल

पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सतिश वसंत खांडेकर (वय ५२), बबलू सतिश खांडेकर (वय २६), गणेश खांडेकर (वय ६०) आणि आर्यन सतिश खांडेकर (वय २०) अशी त्यांची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मुलाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने संशयित आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता संशयित आरोपीच्या पाळीव कुत्र्याने तिच्या अंगाचा चावा घेतला. त्यानंतर तिलाही मारहाण करून तिचे कपडे फाडले. आरोपी बबलू खांडेकर याने स्टीलच्या पाईपने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -