Homeमहाराष्ट्रतुमच्या खिशाला नेमकी किती झळ बसणार? सरकारच्या UPIचार्ज निर्णयाचा A टू Z...

तुमच्या खिशाला नेमकी किती झळ बसणार? सरकारच्या UPIचार्ज निर्णयाचा A टू Z अर्थ

आता यूपीआयच्या दोन हजार रुपयांवरील पेमेंटवर 0.4 टक्के चार्जेस लागणार आहे. एनपीसीआयकडून ही नवी नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 हजार रुपयांपर्यंतटच्या UPI व्यवहारांवर कोणतेही परिणाम होणार नाहीत.

 

2 हजारांपेक्षा जास्त व्यवहारांवर 0.4 टक्के चार्ज लागू होईल. म्हणजेच 2 हजारांपेक्षा जास्त रकमेचं पेमेंट केल्यास 12 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

 

हे शुल्क फक्त पर्सन टू मर्चंट व्यवहारांवरच म्हणजे तुम्ही दुकानदाराला पेमेंट केल्यावरच लागू होणार आहे. हे शुल्क ग्राहकांना नसून दुकानदारांना द्यायचं आहे. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला UPI पेमेंट केल्यानंतर कोणतंही शुल्क लागू होणार नाही.

 

50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यावर दुकानदाराला 200 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. 75 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारावर दुकानदाराला 300 रुपये शुल्क आकारलं जाईल.

 

2 हजारांपेक्षा जास्त पेट्रोल किंवा डिझेल भरलं, रेल्वे तिकीट काढलं किंवा इन्शुरन्स काढला तर 5 रुपये चार्ज केले जातील. दरम्यान, हे नियम आता 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -