Homeमहाराष्ट्रLPG सिलिंडर बुकिंगसाठी 1 ऑक्टोबरपासून नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सक्तीची

LPG सिलिंडर बुकिंगसाठी 1 ऑक्टोबरपासून नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सक्तीची

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून नियमानुकूल किरकोळ विक्री किमतीत आणि अनुदानासह गॅस सिलिंडर रिफिल बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (Biometric Aadhaar Authentication) पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

 

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार या निर्णयाचा मुख्य उद्देश अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यामुळे बनावट आणि अपात्र कनेक्शन रद्द होण्यास, अनुदानाचे व्यावसायिक आणि औद्योगिक कारणांसाठी होणारे गैरवापर रोखण्यास तसेच संपूर्ण अनुदान वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

 

८९.९% ग्राहकांची प्रक्रिया आधीच पूर्ण

 

देशातील तब्बल २७.४३ कोटी ग्राहकांनी (एकूण ग्राहकांच्या ८९.९ टक्के) बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे. ज्या ग्राहकांचे प्रमाणीकरण आधीच पूर्ण झाले आहे, त्यांना पुन्हा काहीही करण्याची गरज नाही. त्यांची गॅस रिफिलिंग सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहील.

 

ज्या ग्राहकांनी अद्याप हे प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांना १ ऑक्टोबरपासून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांना अनुदानासह रिफिल बुकिंग करता येईल.

 

E-KYC कसे आणि कुठे करावे?

ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी अत्यंत सोपे आणि विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:

 

१. सिलिंडर डिलिव्हरीच्या वेळी: गॅस डिलिव्हरी देणारी व्यक्ती ओएमसी (OMC) मोबाईल ॲपचा वापर करून घरपोच ऑन-द-स्पॉट प्रमाणीकरण करू शकते.

२. वितरकाच्या (Distributor) शोरूमवर: ग्राहक आपल्या जवळच्या एलपीजी वितरकाच्या कार्यालयात किंवा शोरूममध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

३. मोबाईल ॲपद्वारे (घरबसल्या): ग्राहक स्वतःच्या मोबाईलवरून खालील अधिकृत ॲप्सद्वारे ई-केवायसी (e-KYC) करू शकतात:

4.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -