Homeकोल्हापूरदेखावे पाहण्यासाठी शहरवासीय रस्त्यावर

देखावे पाहण्यासाठी शहरवासीय रस्त्यावर

जनजागृती करणाऱ्या सामाजिक विषयांपासून इतिहासाची पाने उलगडणाऱ्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखाव्यांपर्यंत… तंत्रज्ञानाची करामत दाखवणाऱ्या हलत्या देखाव्यांपासून भव्य गुहा, प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृतींसह विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी रविवारी रात्रीपर्यंत शहर गर्दीने फुलून गेले.

 

‘चला देखावे पाहायला जाऊया’ हाच एक विषय आता कोल्हापूरकरांमध्ये चर्चेत आहे.

 

दरम्यान, घराघरांतील गणरायाचे शनिवारी विसर्जन झाल्यानंतर शनिवारपासूनच मंडळांनी देखावे खुले केल्याने सहकुटुंब, मित्रपरिवारासह देखावे पाहण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे सायंकाळी सहापासूनच लोक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले.

 

शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी उद्यमनगर, दुधाळी, फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, नागाळा पार्क, कसबा बावडा परिसरात देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. बच्चे कंपनीसह तरुणाई, ज्येष्ठांसाठीही आकर्षण असलेल्या गुहा, प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी रांग लागली होती. विविध रूपातील गणेशमूर्ती पाहण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्यामुळे गुरुवारी रात्रीपर्यंत हा माहौल असाच रंगणार आहे.

 

शहराला जत्रेचे स्वरूप

 

प्रमुख पेठा, मंडळांच्या आसपासचा परिसर याठिकाणी खेळण्यांचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल लागल्यामुळे जत्रेचे स्वरूप आले आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पार्किंग यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -