Saturday, December 21, 2024
Homeकोल्हापूरमहापालिका टेम्पोने चिमुरडीला चिरडले

महापालिका टेम्पोने चिमुरडीला चिरडले

महापालिकेचा टेम्पो आणि मोटारसायकल अपघात यामध्ये पाचगाव रोडवरील रायगड कॉलनी येथील अन्वी विकास कांबळे या चार वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. संभाजीनगर येथे रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. अपघातात बालिकेचे वडील गंभीर जखमी झाले. संतप्‍त जमावाने टेम्पोवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यामुळे काही काळ तणाव होता.

विकास दिलीप कांबळे हे मूळचे वारे वसाहतीतील आहेत. सध्या ते रायगड कॉलनीतील नवीन घरी राहतात. ते संभाजीनगर रेसकोर्स परिसरात खासगी क्लास चालवितात. विकास हे मुलगी अन्वीला घेऊन वारे वसाहत येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलीवरून रायगड कॉलनी येथील घराकडे जात असताना संभाजीनगर येथे एका वाहनाचा दरवाजा उघडताना त्यांच्या हाताला धक्‍का लागला. त्यात तोल जाऊन मुलीसह ते जमिनीवर कोसळले. याचवेळी महापालिकेच्या टेम्पोने दोघांना फरफटत गेले. मेंदूला जबर इजा झाल्याने अन्वीचा जागीच मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -