ताजी बातमी ऑनलाईन टीम
जिल्हा वार्षिक योजनेच्या 2022-23 साठी 521 कोटी 99 लाख रुपयांच्या आराखड्यासह अनुसूचित जाती उपयोजना आणि ओ.टी.एस.पी. योजनेंतर्गत जिल्ह्याच्या एकूण 640 कोटी 20 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता दिल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने ही सभा झाली. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राज्य शासनाने 2022-23 साठी 321 कोटी 99 लाख रुपयांची वित्तीय मर्यादा दिली आहे. या मर्यादेसह शासनाकडे 200 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 116 कोटी 60 लाख रुपयांचा तर ओ.टी.एस.पी. योजनेंतर्गत 1 कोटी 61 लाख असा एकूण 640 कोटी 20 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.
वित्तीय मर्यादेनुसार जिल्हा वार्षिक योजनेचा 321 कोटी 99 लाखांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये गाभा क्षेत्रासाठी 197 कोटी 49 लाखांची, बिगर गाभा क्षेत्रासाठी 98 कोटी 74 लाखांची, नावीन्यपूर्ण योजनांसाठी 11 कोटी 27 लाखांची, सूक्ष्म प्रकल्पासाठी 3 कोटी 22 लाखांची, महिला व बालकल्याणकरिता 9 कोटी 66 लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
अतिरिक्त 200 कोटी रुपयांच्या निधीतून साकव, इतर जिल्हा रस्ते व मजबुतीकरण, ग्रामीण रस्ते विकास, पूर नियंत्रण, नगरोत्थान, शासकीय कार्यालयीन इमारती, रुग्णालये बांधकाम, पोलिस यंत्रणा पायाभूत सुविधा, क्रीडा विभागाकडील योजना आदी कामे केली जाणार आहेत. राज्यस्तरीय समितीची बैठक दि.21 जानेवारीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत अतिरिक्त मागणीसह जिल्हा वार्षिक योजनेचा 522 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला जाईल.
कोल्हापूर : जिल्ह्याचा 640 कोटींचा प्रारूप आराखडा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -