Sunday, December 22, 2024
Homeजरा हटके10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

स्मार्टफोनमध्ये चांगला बॅटरी बॅकअप मिळावा यासाठी यूजर्स अनेक पद्धतींचा अवलंब करतात, पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे मजबूत बॅटरी बॅकअपसह येतात.

सामान्यतः स्मार्टफोनमध्ये 4200 mAh ते 6000 mAh पर्यंतची बॅटरी असते, परंतु आम्ही तुम्हाला 7000 mAh आणि 10,000 mAh बॅटरीसोबत येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.

Samsung Galaxy F62 गेल्या वर्षी भारतात लॉन्च झाला होता. हा फोन Samsung Exynos प्रोसेसरसह येतो. यात 7000 mAh ची बॅटरी आहे, जी मजबूत बॅटरी बॅकअप देईल. या मोबाईलच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तसेच, यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. त्याची किंमत 29999 रुपये आहे.

Tecno Pova 2 हा स्मार्टफोन 10499 रुपयांना खरेदी करता येईल. या मोबाईलमध्ये 6.95 इंचांचा डिस्प्ले आहे. तसेच, यात Mediatek Helio G85 प्रोसेसर आणि 4 GB रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, तर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Ulefone Power Armor 14 हा एक रग्ड फोन आहे जो Amazon वर लिस्टेड झाला आहे. हा फोन 27,950 रुपयांमध्ये येतो. या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 6.52 इंचांचा डिस्प्ले आहे. यासोबतच यामध्ये 10000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात फास्ट चार्जिंगचादेखील समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -