Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन तरुणीची सोशल मीडियावर गुंडगिरी

अल्पवयीन तरुणीची सोशल मीडियावर गुंडगिरी

ताजी बातमी ऑनलाइन टीम

पिंपरी- शहरात अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा शस्त्रांसोबत फोटो व्हिडीओ शेअर करता धमकी देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आता या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये मुलीही मागे नसल्याचे दिसून झाले आहे. मुलीही सोशल मीडियात गुंडागिरी करू लागल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अल्पवयीन मुलीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती अगदी सराईत गुंडाप्रमाणे गुंडगिरीची भाषा बोलताना दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडियात अकाऊंटवरून तिने आपल्या गुंडगिरीचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. या व्हिडिओत अल्पवयीन तरुणी म्हणते कुठला डॉन? आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील 302 असे थेट म्हणताना दिसत आहे. पोलिसांकडून खूनाच्या प्रकरणातील आरोपींवर 302 हे कलम लावले जाते. या तरुणीने यावर व्हिडीओ बनवला आहे. एवढ्यावरच न थांबता तरुणीने शब्दाने शब्द वाढत असल्याने शिव्या न देता हाणामारी करून भांडणे सोडवायची असाही सल्ला आपलया व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. या प्रकारच्या व्हिडीओमुळे शहरातील गुन्हेगारी कोणत्या स्तरापर्यंत जाऊन पोहचली आहे,असा प्रश्न निर्माण होताना दिसतो.

पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. पोलिसांनी सोशल मीडियावरून भाईगिरी करणाऱ्याना चोप देत त्याची झोप उडवल्याचेही अनेक किस्से आहेत. मात्र तरी वाढती गुन्हेगार आद्यपही थांबवण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -