ताजी बातमी ऑनलाइन टीम
25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 चं आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही, असा इशारा माजी गृहमंत्री स्वं. आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील विरोधकांना दिला आहे. रोहित पाटील हे सांगलीतील कवठेमहांकाळ परिसरात दौऱ्यात होते. सध्या सांगली जिल्ह्यात नगर पंचायतीच्या निवडणुकीचे वातावरण सुरु आहे.
यामुळे राजकीय सभा, तसेच प्रचार दौरे सुरु आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात राहित पाटील यांचा दौरा सुरु आहे. या दोऱ्यात त्यांनी काल कवठेमहांकाळ येथे एक प्रचार सभा घेतली. या सभेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत एका सभेत राहित पाटील बोलत असल्याचं दिसत आहे. यात त्यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. 25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 चं आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही असा इशारा या व्हिडिओत त्यांनी दिला आहे. या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
माझं वयं २३ आहे, २५ होईपर्यंत विरोधकांच काहीच ठेवत नाही : रोहित पाटील
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -