घराच्या भिंतीवर धुंकल्याचा जाब विचारला म्हणून एका कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली, त्यांच्या घराच्या दरवाजावर लाथा घालून घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षाची काच फोडून मोठे नुकसान केल्याचा प्रकार चिंतामणी नगर मध्ये घडला आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी काही महिलांसह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील चिंतामणीनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सुनीता सुनील मोहिते यांनी मारहाण आणि रिक्षाची मोडतोड केल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित विजय मोरे, मंधन मोटे, अथर्व माळी, ओकार माळी, अनिता मोटे, सावित्री मोटे, कविता माळी, शुभांगी माळी, दीपक मोटे (सर्वजण रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी) आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी शेजारी राहणान्या दीपक मोटे बाच्या घराला रंग देण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रंग देणाऱ्या कामगारांपैकी एकजण भिंतीवर सुंकला, याचा जाब मोहिते यांनी विचारल्याचा राग आल्याने संशयितांनी मोहिते यांच्या घराच्या दरवाजावर लाथा घालून घरात घुसून शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.
