थंडीपासून बचाव करण्यासाठी केवळ उबदार कपडे घालणे पुरेसे नाही. थंडीच्या दिवसांमध्ये निर्माण होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आहाराचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळाच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला, घशात दुखणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना कारावा लागतो. सोबतच अशक्तपणा देखील जाणवतो. अचानक तापमाणात घट झाल्याने सर्दी, खोकल्यासह तुम्हाला अस्वस्थ देखील वाटू शकते. अनेक जण थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे घालतात. परंतु थंडीपासून बचावासाठी केवळ उबदार कपडे घालून उपयोग नाही तर तुम्हाला तुमच्या आहाराची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही हिवाळ्यामध्ये आहारात विविध मसाल्यांच्या पदार्थांचा तसेच औषधी वनस्पतींचा समावेश केल्यास सर्दी, खोकल्यासारख्या समस्येंपासून दूर राहू शकता. आज आपण अशाच काही सर्दी, खोकल्यासारख्या आजारांवर आराम देणाऱ्या पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.
सर्दी, खोकल्यामध्ये कोणते पदार्थ टाळावेत?
शीत पेय
दही विशेषतः फळांसोबत खाल्ल्यास
आईस्क्रीम, गोड पदार्थ, तळलेले अन्न आणि जड अन्न.
दिवसा झोपणे आणि रात्री उशिरापर्यंत जागे राहणे.
सर्दीपासून बचावासाठी आयुर्वेदिक काढा
7-8 तुळशीची पाने, आल्याचा एक छोटा तुकडा, लसणाच्या काही पाकळ्या, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा मेथीदाणे आणि थोडीशी हळद एक लिटर पाण्यात चांगली उकळून घ्या. हे पाणी रोज सकाळी थोडे-थोडे प्या असे केल्यास तुम्हाला सर्दीपासून आराम मिळेल.
सर्दी, खोकल्यापासून बचावासाठी इतर उपाय
सोबतच आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी थंड पाणी वापरू नका. पचन सुधारण्यासाठी कोमट पाणी प्या. मधाचे सेवन करा,
आले, हळद, लिंबू टाकून चहा प्या, जर तुमचा घसा खवखवत असेल किंवा दुखत असेल तर यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला जर सर्दीचा सारखाच त्रास होत असेल तर ठराविक अंतराने गरम पाण्याची वाफ घ्या. वाफ घेताना पाण्यात निलगिरी तेल किंवा हळद घाला, यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
टीप : वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली आहे, कोणतेही औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.