Monday, December 23, 2024
Homeसांगलीइस्लामपुरात मोटरसायकल चोरटा गजाआड

इस्लामपुरात मोटरसायकल चोरटा गजाआड

प्रशासकीय इमारत परिसरात चोरीची मोटार सायकल विक्रीसाठी आलेल्या दीपक पांडुरंग पाटील (सध्या रा. कोळे, ता.कराड, जि. सातारा. मुळ गाव चिकुर्डे ता. वाळवा) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्या कडील चोरीच्या ५ मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी इस्लामपुरातील प्रशासकीय इमारत परिसरात एक जण चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचून संशयित दीपक पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोटारसायकल बांबवडे (ता.शिराळा) येथून चोरी केल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -