भारतामध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट आहे. कोरोना रुग्णांची संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी-कधी रुग्णसंख्या कमी होतेय पण कोरोनाची भीती काही संपलेली नाही. कोरोनावर आपण आतापर्यंत ज्या लसी (Corona Vaccine) घेतल्या आहेत या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस आपण घेतले आहे. पण आता एक अशी लस आली आहे. त्या लसीचा एकच डोस खूप प्रभावी असणार आहे. तिचा दुसरा डोस घेण्याची गरज लागणार आहे. ही लस म्हणजे स्पुतनिक लाईट (Sputnik Light). या लसीच्या वापराला डीसीजीआयकडून (DCGI) मंजुरी मिळाली आहे.
स्पुतनिक लाईट ही कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) खूपच शक्तीशाली आहे. ही लस ऐवढी प्रभावी आहे की या लसीमध्ये दोन डोसची ताकद आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (Drugs Control General of India) सिंगल डोसच्या स्पुतनिक लाईटच्या वापरला मंजुरी दिली आहे. डीसीजीआयकडून स्पुतनिक लाईटच्या वापरचा मार्ग मोकळा झाला आहे. या लसीच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यास मदत मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.