Monday, December 23, 2024
Homeजरा हटकेरोझ डे का साजरा केला जातो?, काय आहे यामागचा इतिहास घ्या जाणून!

रोझ डे का साजरा केला जातो?, काय आहे यामागचा इतिहास घ्या जाणून!

प्रेमीयुगुल फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन डेची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीकला आजपासून सुरुवात झाली आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डेने होते. या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला गुलाब म्हणजेच रोझ (Rose) देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेमीयुगुल वर्षभर व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीपर्यंत चालतो. रोझ डे दरवर्षी 7 फेब्रुवारीला साजरा केला जातो. रोझ डे सुरु होण्याच्या काही दिवसआधीच बाजारामध्ये लाल (Red Rose), पिवळा , पांढरा (White Rose) आणि गुलाबी गुलाब विकायला येतात. रोझ डे हा तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप चांगला दिवस मानला जातो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला रोज डे का साजरा केला जातो आणि त्यामागची कथा काय आहे हे सांगणार आहोत…

रोझ डे का साजरा केला जातो?
रोझ डेच्या दिवशी लोक त्यांचे प्रेम त्यांच्या आवडीच्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. काही लोकं वर्षभर मनामध्ये साठवून ठेवलेले प्रेम यादिवशी गुलाबाचे फुल देऊन आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. हा दिवस प्रेमीयुगुलांच्या आयुष्यात महत्वाचा मानला जातो.

रोझ डेचा इतिहास –
गुलाबाचे फूल हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, मुघल बेगम नूरजहाँला लाल गुलाब खूप आवडत होते. असे म्हणतात की, नूरजहाँचे मन प्रसन्न करण्यासाठी तिचा नवरा रोज ताजे गुलाब तिच्या वाड्यात पाठवत असे. दुसर्‍या कथेनुसार, राणी व्हिक्टोरियाच्या (Queen Victoria) काळात, लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबांची देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू केली. असे मानले जाते की, व्हिक्टोरियन आणि रोमन देखील गुलाबाने त्यांचे प्रेम व्यक्त करायचे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -