Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रगिझर गॅस गळतीने महिला पायलटचा गुदमरुन मृत्यू

गिझर गॅस गळतीने महिला पायलटचा गुदमरुन मृत्यू

गिझऱमधून गॅस गळती झाल्याने एअर इंडियाच्या वरिष्ठ महिला पायलटचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. संबधित महिला पायलट अंघोळीला गेल्या असता, त्यांनी बाथरुममधील गिझर सुरु केला होता. दरम्यान गिझरमधून वायू गळती झाल्याने त्यांचा बाथरुममध्येच गुदमरुन अंत झाला.

रश्मी गायधनी असे मृत पावलेल्या वरिष्ठ महिला पायलटचे नाव आहे. त्या मुंबईत एअर इंडिया कंपनीत कार्यरत होत्या. अलिकडेच त्या नाशिक येथे आल्या होत्या. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी या सकाळी अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेल्या. त्यांनी गिझर चालू केला. दरम्यान गिझर मधून गॅस गळती झाल्याने त्यांचा बाथरुममध्ये गुदमरुम मृत्यू झाला. असा धक्कादायक पद्धतीने महिला पायलटचा मृत्यू झाल्याने कुटुंब हादरुन गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -