Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनशाहरुख खानच्या 'दुआ' वरून विकृत मनोवृत्तीचा कळस

शाहरुख खानच्या ‘दुआ’ वरून विकृत मनोवृत्तीचा कळस

लता मंगेशकर यांचे पार्थिव काल अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे ठेवले होते. यावेळी शाहरुख खान, आमिर खान, सचिन तेंडुलकर असे दिग्गज सेलिब्रिटींनी शिवाजी पार्कवर उपस्थिती दर्शवली. यावेळी अंत्यदर्शनासाठी शाहरुख खान गेला असता त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले. हे व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले की, हे केवळ ‘किंग’च करू शकतो.

खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गेला होता. यावेळी तेथील व्हिडिओज व्हायरल झाले. यामध्ये तो मॅनेजर पूजा ददलानीसोबत दिसतो आहे. पार्थिवाला पुष्प अर्पण करण्यासाठी त्याच्या हातात पुष्पचक्रदेखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो हातात पुष्पचक्र घेऊन चेहऱ्यावर मास्क घातलेला दिसत आहे. त्याच्यासोबत सचिन तेंडुलकरही दिसत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये, खान लता मंगेशकर यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आधी दुआ करताना दिसतो. दुसऱ्या क्षणी हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -