Friday, November 22, 2024
Homeजरा हटकेआज साजरा केला जातोय चॉकलेट डे, जाणून घ्या यामागचा इतिहास!

आज साजरा केला जातोय चॉकलेट डे, जाणून घ्या यामागचा इतिहास!

चॉकलेट डेला व्हेलेंटाईन वीकमधील सर्वात आवडता दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येक वयाच्या व्यक्ती एकमेकांना चॉकलेट देतात. चॉकलेट डेच्या दिवशी आपल्या पार्टनरला चॉकलेट देऊन तुम्ही नातं आणखी मजबूत करु शकता. चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडतो. चॉकलेट आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेट गुणधर्म असतात. त्यामुळे चॉकलेट ब्लड फ्लो, हार्ट, स्किन यांच्यासाठी फायदेशीर मानले जाते. चॉकलेट खाल्ल्यामुळे मूड देखील चांगला होतो.

सर्वात आधी अमेरिकेमध्ये चार हजार वर्षांपूर्वी कोकोचे झाड पाहिले गेले होते. अमेरिकेच्या जंगालात असलेल्या कोकोच्या बियांपासून चॉकलेट तयार केले गेले. जगात सर्वात आधी अमेरिका आणि मॅक्सिकोमध्ये चॉकलेटचा प्रयोग करण्यात आला होता. असे सांगितले जाते की, 1528 मध्ये स्पेनच्या राजाने मॅक्सिकोवर कब्जा केला. या राजाला कोको खूप आवडत होते. त्यानंतर राजाने कोकोच्या बीया मॅक्सिकोवरुन स्पेनला घेऊन गेला. त्यानंतर स्पेनमध्ये चॉकलेट खाण्यास सुरुवात झाली.

1829 मध्ये कॉनराड जोहान्स वान हॉटन नावाने कोको प्रेस नावाची मशीन तयार करण्यात आली. असे सांगितले जाते की, आधी चॉकलेटची चव तिखट होती. पण जोहान्सने जी मशीन तयार केली त्यामधून चॉकलेटचा तिखटपणा दूर करण्यात आला. 1848 मध्ये ब्रिटिश चॉकलेट कंपनी जे. एर फ्राई अॅण्ड सन्सने कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर मिक्स करुन त्यापासून चॉकलेट तयार केले. अशापद्धतीने वेळेनुसार चॉकलेटच्या चवीमध्ये देखील बदल होत गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -