ताजी बातमी ऑनलाइन टीम
आज बुधवार 16 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. आज सकाळी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळं राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यात होणार आहे.
Maharashtra News Live Update : किरीट सोमय्या, नारायण राणेंची आज पत्रकार परिषद, संजय राऊतांना प्रत्युत्तर देणार?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -