बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तरने नुकताच गर्लफ्रेंड शिबानीसोबत लग्न केले. फरहानचा मित्र रितेश सिधवानीने फरहान आणि शिबानीसाठी गुरुवारी शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरापासून ते अर्जुन कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण हे या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. पण सर्वांच्या नजरा मलायका अरोरावर होत्या. कारण मलायका अरोराने या पार्टीमध्ये नेहमीप्रमाणे जबरदस्त ड्रेसिंग केली होती. मलायकाला या लूकमध्ये पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसला. मलायकाच्या या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश दीवा मानली जाते आणि गुरुवारी झालेल्या या पार्टीत तिने हे सत्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मलायका अरोराचा रिव्हिलिंग ड्रेस सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्रीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. मलायका अरोरा तिच्या गर्ल गँगसोबत पार्टीत पोहोचली होती. या पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा मलायका अरोरावरच होत्या. तिने ब्लॅक कलरचा पारदर्शक गाऊन घातला होता. ज्यामध्ये बाजूला एक कट होता. मलायका या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.