Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयकवेळीच व्हा सावध! टॉयलेट सीटवर बसून Mobileचा वापर करताय, आरोग्यासाठी ठरु शकतो...

वेळीच व्हा सावध! टॉयलेट सीटवर बसून Mobileचा वापर करताय, आरोग्यासाठी ठरु शकतो धोकादायक

टॉयलेटला गेल्यानंतर अनेकांना जास्तवेळ टॉयलेट सीटवर बसण्याची सवयी असते. पण ही सवयी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. काही जण टॉयलेट सीटवर बसून मोबाईल चेक करत बसतात, तर काही जण ऑफिसचे काम करत बसतात, तर काहींना टॉयलेट सीटवर बसून पेपर वाचण्याची सवय असते. त्यामुळे जास्त वेळ आपण टॉयलेट सीटवर घालवतो. पण टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसून राहणं हे आरोग्यासाठी खूपच धोकादायक असते.

टॉयलेटमध्ये जास्त वेळ मोबाईल वापरणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच त्रासदायक आहे. मोबाईलचा वापर करत असल्यामुळे आपण जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतो. टॉयलेटमध्ये जास्तवेळ बसून राहिल्यामुळे आपल्या गुदद्वारावर ताण येतो. या ताणामुळे त्या व्यक्तीला मूळव्याधासारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन तुम्ही जर जास्तवेळ टॉयलेटमध्ये बसल असाल तर ही सवयी मोडा.

जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसून राहिल्यामुळे मलाशय बाहेर आल्याचा त्रास देखील होऊ शकतो. तसंच, नेहमी टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्यामुळे शरीराला देखील त्याची सवयी होऊ जाते आणि त्यामुळे आपण जास्त वेळ टॉयलेटमध्येच बसून राहतो. कोणत्याही व्यक्तीला मोकळं होण्यासाठी दोन ते तीन मिनिटं ही पुरेशी आहेत. मात्र मोबाईलची सवयी असल्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळ तिथेच घालवतो. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जातो त्यावेळी अनेक प्रकारचे जंतू फोनवर बसतात. आपण टॉयलेटच्या बाहेर आल्यानंतर हात स्वच्छ धुवतो पण मोबाईल धुवत नाही. पुन्हा तोच मोबाईल आपण हातात घेतो त्यामुळे आपण या जंतूच्या संपर्कात येतो. त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -