महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती नेहमी टीका करणार रयत क्रांतीचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना कॅटबरी भरवल्याने ‘कुछ मिठा हो जाए’ची चर्चेने पुन्हा सांगली जिल्ह्यात जोर धरल्याचे पाहायला मिळाले. सांगलीच्या राजकारणात नेहमी टीका टिपणी केल्याचे पाहायला मिळते. सदाभाऊ खोत हे विरोधी पक्षात असल्यामुळे राज्याच्या प्रत्येक गोष्टीवरती टीका करताना पाहायला मिळते. पण काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील आणि रयत क्रांतीचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत हे कट्टर विरोधक काल सांगलीच्या इस्लामपूर नगरपालिकेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. तिथं भरसभेत एका चिमुकलीने जयंत पाटील यांना कॅटबरी दिली.
त्यावेळी जयंत पाटलांनी ती कॅटबरी लगेच सदाभाऊ खोत यांना दिल्याने उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला असल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेकांनी त्याचा व्हिडीओ त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो प्रचंड व्हायरल झाल्याचे सांगली, इस्लामपूर शहरात पाहायला मिळत आहे. ईडीच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती धाड पडत असताना केंद्रातील सरकार महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या मार्गावर असल्याचे अनेकदा म्हणत आहे.
राज्यात अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना राष्ट्रीय संस्थांनकडून टार्गेट केलं जातं असल्याचा आरोप महाविकास आघाडीत सामील असलेल्या अनेक नेत्यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील नेते नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर, शिवसेनेचे यशवंत जाधव यांची देखील चौकशी केली. भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांची चौकशी केली असल्याचे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच सांगलीतील दोन नेते एकाच व्यासपीठावर उद्घटनाच्या निमित्ताने येत असल्याने नेमकं काय बोलणार यांची कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. परंतु कॅटबरी खायला दिल्याने अनेकांना आनंद झाल्याचा पाहायला मिळाला.