‘आशिकी-2’ सिनेमात आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा गायक अंकित तिवारीने 2010 साली करियरला सुरूवात केली. पण 2014 साली त्याच्यासोबत अशी घटना घडली, ज्याचा परिणाम गायकाच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यावर झाला. 2015 नंतर अंकितने एकाही गाण्याला स्वतःचा आवाज दिला नाही. त्याच्यासोबत असं काय घडलं होतं ज्यामुळे पोलिसांनी अंकितला अटक देखील केली.
2014 साली अंकित यशाचं शिखर चढत होता. तेव्हा 9 मे 2014 साली गर्लफ्रेंडने त्याच्यावर बलात्काराचे आरोप लावले. ज्यामुळे पोलिसांनी त्याला अटक देखील केली. अंकितच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्या भावावर देखील गंभीर आरोप लावले.
त्यानंतर दोन्ही भावांवर न्यायालयात खटला सुरू होता. अखेर तीन वर्षांनंतर म्हणजे 2017 साली अंकित तिवारी आणि त्याचा भाऊ दोघांनाही पुराव्याअभावी मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले.
2018 मध्ये सर्व आरोपातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर एका वर्षानंतर अंकित तिवारीने कानपूरमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार पल्लवी शुक्लासोबत लग्न केले. मात्र, स्वत:वरील आरोपांचा त्याच्या जीवनावर वाईट परिणाम झाला. त्यानंतर त्याने एकही गाणं गायलं नाही.