बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा
आगामी चित्रपट ‘फायटर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत हृतिकच्या चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. फायटर चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.
अभिनेता हृतिक रोशनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हृतिक रोशनने एक व्हिडिओ शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट आधी 26 जानेवारीला प्रदर्शित होणार होता पण नंतर त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.
फायटर’ चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसोबत अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हृतिक रोशच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. हृतिकच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही अॅक्शन पाहायाला मिळणार आहे. अॅक्शन-थ्रिलर असलेल्या या चित्रपटात हृतिक रोशन हाय वोल्टेज अॅक्शन आणि एरिअल स्टंट करताना दिसून येणार आहे. या चित्रपटात ह्रतिक रोशन एका फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भारतातली पहिली एरिअल अॅक्शन फिल्म असणार आहे.