Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून पोटनिवडणूक लढणार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी...

प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून पोटनिवडणूक लढणार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पश्चिम बंगालमध्ये (West bangal) 12 एप्रिलला पोटनिडवणूक होत आहे. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामद्ये आज एक मोठा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी घेतला आहे.

प्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांना आसनसोल मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचा चेहरा घोषित करण्यात आलंय, अशी घोषण खुद्द तृणमूलच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तर बालीगंज विधानसभा जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूलनं बाबुल सुप्रियो यांना तृणमूलचा चेहरा बनवलाय. बाबुल सुप्रियो हे आसनसोल मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र, त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेच्या राजीनामा दिला होता त्यामुळे आसनसोलच्या याच जागेवर आता प्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -