Saturday, July 26, 2025
Homeमनोरंजनसावधान! ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची ‘लिंक’ आल्यास ओपन करू नका, नाहीतर...

सावधान! ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची ‘लिंक’ आल्यास ओपन करू नका, नाहीतर…

ताजी बातमी ऑनलाइन टीम

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. चित्रपट पाहण्यासाठी अनेक जण चित्रपटगृहात गेले आहेत, तर अनेकजण अजूनही चित्रपट पाहण्याचा बेत आखत आहेत. काश्मीर फाईल्सबाबत प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कश्मीर फाइल्स प्रदर्शित करण्यात आलेली बहुतेक चित्रपटगृहे हाऊसफुल्ल आहेत. देशातील अनेक भागातील सिनेमागृहांमध्ये काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाच्या शोची तिकिटे लोकांना सहज मिळत नाहीत, असे अनेकांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत लोक आता ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी पर्यायी माध्यमाच्या शोधात आहेत.



देशातील अनेक राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’च्या चर्चेनंतर आता या चित्रपटाने हॅकर्सचे लक्ष वेधले आहे. तुमच्या मोबाईलवर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी कोणतीही लिंक आली असेल तर तुम्हाला त्यावर काळजीपूर्वक क्लिक करावे लागेल. द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहण्यासाठी सोशल मीडिया साइट्वर विविध लिंक्स पाठवण्यात येत आहेत. यातील बहुतांश लिंक्स देशाच्या विविध राज्यातील हॅकर्सकडून सातत्याने पाठवल्या जात आहेत. खासकरून अशा लिंक वॉट्सॲपवरून मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. काहीकण अशा आमीषाला बळी पडल्याचे दिसत आहे

काश्मीर फाइल्स चित्रपट ओपन केल्यास लिंकद्वारे हॅकर्स तुमचे बँक खाते हॅक करू शकतात, त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या अशा लिंक्स ओपन करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी काळजी घेणे अवश्यक आहे. आजकाल द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहण्यासाठी इतकी मागणी आहे की अनेकांना तो घरी बसून त्यांच्या मोबाईलवर मोफत पाहायचा आहे. याचा फायदा घेत तुमचे बँक खाते हॅक करण्यासाठी सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -