Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनThe Kashmir Files बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचण्यास सज्ज ; 100 कोटींपासून...

The Kashmir Files बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचण्यास सज्ज ; 100 कोटींपासून काही पावलं दूर

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचण्यास सज्ज झाला आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास 80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनानंतरचा पहिला आठवडा हा प्रत्येक चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा असतो. याच पहिल्या आठवड्यात ‘द काश्मीर फाईल्स’ने प्रेक्षक-समीक्षकांवर जबरदस्त छाप सोडली आहे. प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही. ‘द काश्मीर फाईल्स’च्या कथेने प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणला आहे. फक्त वीकेंडच नाही तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवसांतही चित्रपटाचे शोज हाऊसफुल झाले आहेत. सुरुवातीला फक्त 600 हून अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद पाहून ‘द काश्मीर फाईल्स’चे शोज वाढवण्यात आले आहेत.

सहाव्या दिवशी या चित्रपटाने 19.05 कोटी रुपये कमावले आहेत. सहा दिवसात ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईचा आकडा हा 79.25 कोटी रुपये इतका झाला आहे. 100 कोटींपाहून अवघे काही पाऊल दूर हा चित्रपट आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘द काश्मीर फाईल्स’ची कमाई-
शुक्रवार- 3.55 कोटी रुपये
शनिवार- 8.50 कोटी रुपये
रविवार- 15.10 कोटी रुपये
सोमवार- 15.05 कोटी रुपये
मंगळवार- 18 कोटी रुपये
बुधवार- 19.05 कोटी रुपये
एकूण- 79.25 कोटी रुपये

दुसऱ्या आठवड्यात विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट आणखी जास्त कमाई करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. होळीच्या सुट्ट्या आणि महिन्यातील दुसरा वीकेंड असल्याने अधिकाधिक प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये येतील, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत. पुढील एक-दोन दिवसांत ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईचा आकडा हा 100 कोटींवर जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -