ताजी बातमी ऑनलाइन टीम
सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. हेच गाणे सोशल मीडियावर रील्स आणि शॉर्ट व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. फक्त युजर्स नाही तर अनेक सेलिब्रिटींना सुद्धा या गाण्याने भुरळ घातली आहे. या गाण्यावर अनेक कलाकार रील्स तयार करून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत आहेत. परंतु कच्चा बादाम गाण्याला टक्कर देण्यासाठी एक नवे गाणे आले आहे. ‘कच्चा अमरूद’ असे या गाण्याचे बोल आहेत. होय, सध्या सोशल मीडियावर कच्चा अमरूद नावाचे हे नवीन गाणे धुमाकूळ घालत आहे.
कच्चा अमरूदच्या रिमिक्स म्युझिक व्हिडिओमध्ये अगदी काही काळापूर्वी गल्लीबोळात पेरू विकणारे काका दिसत आहेत. सोशल मीडियावर हे काका चांगलेच व्हायरल झाले आहेत. ‘कच्चा बदाम’ नंतर आता ‘कच्चा अमरूद’ गाणे सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. ‘कच्चा अमरुद’ हे गाणे १४ मार्च रोजी रिलीज झाले आहे. नेटकऱ्यांना हे गाणे आवडले असून अनेक जण त्यावर रील्स बनवू लागले आहेत.
दरम्यान, कच्चा बादामनंतर कच्चा अमरुद नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले असून हे अमरुदवाले काका ट्रेंडमध्ये आहेत आणि व्हायरल झाले आहेत. या गाण्याला इन्स्टाग्रामवर १ लाख २० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.