Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजनकाश्मीर फाईल्स साठी कलाकारांनी इतके घेतले मानधन ( वाचा कोण किती घेतले...

काश्मीर फाईल्स साठी कलाकारांनी इतके घेतले मानधन ( वाचा कोण किती घेतले )

ताजी बातमी ऑनलाईन टीम
११ मार्च रोजी रिलीज झालेल्या काश्मीर फाईल्स या लो बजेट चित्रपटाने नवे रेकॉर्ड करून १२ दिवसात २०० कोटींचा व्यवसाय केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अगदी कमी स्क्रीन मिळाले तरीही त्याने उत्पन्नाचे रेकॉर्ड केले आहे. प्रेक्षकांकडून देश विदेशात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आता त्यामुळे या चित्रपटाला अधिक स्क्रीन उपलब्ध करून दिले गेले आहेत.


या लो बजेट चित्रपटासाठी त्यातील कलाकारांना किती पैसे मिळाले याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी आयएएस ब्रह्मदत्त यांची भूमिका साकारणाऱ्या मिथुन चक्रवर्तीने सर्वाधिक म्हणजे दीड कोटी रुपये मानधन घेतले आहे. पुष्करनाथ पंडित यांची भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांनी १ कोटी मानधन घेतले आहे तर राधिका मेननची भूमिका साकारणाऱ्या पल्लवी जोशी यांनी ५० ते ७० लाख रुपये घेतले आहेत. कृष्णा पंडित साकारणाऱ्या दर्शन कुमार यांनी ४५ लाख रुपये घेतले आहेत तर दिग्दर्शन करणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी १ कोटी रुपये घेतले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -