Thursday, November 7, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक बळी; ओव्हरलोड रिक्षातून दोघी पडल्या; डोक्याच्या चिंधड्या उडून...

एसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक बळी; ओव्हरलोड रिक्षातून दोघी पडल्या; डोक्याच्या चिंधड्या उडून एकीचा मृत्यू

एसटी बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याचेच उदाहरण म्हणजे जळगावातील विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू. धावत्या रिक्षेतून तोल गेल्याने अकरावीमधील 17 वर्षीय विद्यार्थिनी (Student) खाली पडली. या अपघातात तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर जळगावला नेताना वाटेतच तिचा मृत्यू (Death) झाल्याची घटना गुरुवारी घडली. तृप्ती भगवान चौधरी असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. एसटी बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने महाविद्यालयात ये जा करत होती. हाच रिक्षाचा प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला आहे.

तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला शिकत होती. ती एसटीने प्रवास करायची मात्र गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु असल्याने एसटी बंद आहे. त्यामुळे तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये जा करत होती. कॉलेजची वेळ सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी ऑटोरिक्षाने निघाली. यावेळी ती प्रवासी वाहतूक करणार्‍या खाजगी रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली होती.

प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रिण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. जळगावला नेत असताना वाटेतच तृप्तीची प्राणज्योत मालवली. जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तृप्तीवर दुपारी 4 वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी एसटी दिवसभरातून 21 फेऱ्या करायची. मात्र, कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होताच 8 नोव्हेंबरला एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -