Wednesday, July 23, 2025
Homeक्रीडाDhoni-Gambhir : रशिया-युक्रेन युद्धावरून धोनीसोबत ‘गंभीर’ चर्चा?

Dhoni-Gambhir : रशिया-युक्रेन युद्धावरून धोनीसोबत ‘गंभीर’ चर्चा?

लखनौ सुपर जायंट्सने हाय स्कोअरिंग सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहचली. यातच केएल राहुलच्या लखनौ संघाने चेन्नईचा ६ गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे दोघे मैदानात चर्चा करताना दिसले. दोघेही बराच वेळ बोलताना दिसले. या भेटीनंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली. अनेकांनी मिम्सही करून ते शेअर केले. यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

लखनौला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या सामन्यात लखनौने खूप चांगला खेळ केला होता. पण तेवतियाच्या आक्रमक खेळीच्या जोरावर गुरजातने त्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. चेन्नई विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीचे फलंदाज एविन लुईस आणि आयुष बडोनी यांनी तुफानी खेळी केली. या जोडीने १९ व्या षटकात शिवम दुबेच्या गोलंदाजीवर आक्रमण करत २५ धावा कुटल्या आणि सहा गडी राखून त्यांनी स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

सामना संपल्यानंतर चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि लखनौ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर भेटले. दोघांमध्ये दिर्घ चर्चा रंगली होती. त्यांच्या मैदानावरील भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -