Thursday, June 4, 2026
Homeक्रीडाआज चेन्नई विरुद्ध पंजाबचा सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल...

आज चेन्नई विरुद्ध पंजाबचा सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs PBKS) यांच्यातील IPL-2022 मधला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्यासाठी संध्याकाळी जवळपास साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर पहिला डाव साडेसात वाजता सुरू होईल. आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण, चेन्नई (CSK) दोनपैकी दोन्ही सामने हरला आहे.


तर पंजाब दोन पैकी एका सामन्यात जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघाला चांगली कामगिरी आजच्या सामन्यात करावी लागणार आहे. तिकडे राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला मात देऊन पॉईंट्सच्या टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर गुजरातनेही दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटलचा पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच केली. आता सनराईजर्स हैदराबाद सोडून सगळेच संघ दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त तीन संघ दोन-दोन सामने जिंकले शकले आहे. तर गुजरातने दोन सामने खेळून ते दोन्हीही सामने जिंकले आहेत. तर पॉईंट्स तालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरनं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय. यामुळे चेन्नई आणि पंजाबला आपल्या कामाची धमक दाखवून पॉईंटच्या टेबलमधील स्थानासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कसा पाहणार सामना ते जाणून घ्या…


चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाणार?
चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?
चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यासाठी संध्याकाळी जवळपास साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे, तर पहिला डाव साडेसात वाजता सुरू होईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहता येईल?
चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग ऑनलाइन कुठे पाहता येईल?
लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह Disney+Hotstar वर सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सा मन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -