Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगचोरट्याने केले मुलीचे अपहरण

चोरट्याने केले मुलीचे अपहरण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मांजरीवाडी तालुका चिकोडी येथील ११ वर्षाच्या मुलीचे चाेरट्याने अपहरण केल्याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. मांजरी गावचा रहिवासी व कुख्यात दरोडेखोर अनिल रामू लंबुगोळ याने सदर मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात अंकली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.



याबाबत अंकली पोलिस स्थानकातून समजलेली माहिती अशी की, दरोडेखोर व पोलिसांच्या हिटलिस्टवरील अनिल लंबूगोळ हा मांजरीगावचा रहिवासी आहे. रविवारी रात्री ताे मांजरीवाडी येथे एका घराची कौले काढून चोरी करत असताना दिसला. यावेळी त्‍याने घर मालकाची ११ वर्षाची मुलीचे अपहरण केल्‍याची नाेंद अंकली पोलिस स्थानकात झाली आहे. अंकली पोलीस अनिल लंबूगोळ याचा शाेध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -