Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनरणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, ‘येथे’ घेणार सात फेरे

रणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, ‘येथे’ घेणार सात फेरे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलीवूड कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाहाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या कपलने आपल्या कथित विवाहासंबंधी अद्याप अधिकृतपणे काहीच सांगितलेले नाही. आता असे समजते की, रणबीर-आलियाच्या विवाहाचे स्थळ निश्चित झालेले आहे.


रणबीर आलियासोबत ज्या ठिकाणी सात फेरे घेणार आहे, त्या ठिकाणी कधी काळी त्यांच्या आई-वडिलांचा विवाह झाला होता. स्व. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी 20 जानेवारी 1980 रोजी प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये विवाह केला होता. आपल्या आई-वडिलांसारखे रणबीर कपूरही चेंबूरस्थित ‘आरके हाऊस’मध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. असेही समजते की, या दोघांचा विवाह याच एप्रिलमध्ये होणार आहे. या विवाहात सुमारे 450 पाहुणे सहभागी होणार आहेत. मात्र, अद्याप विवाहाची तारीख निश्चित केली नसल्याचे समजते.

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, आपल्या चित्रपतांबरोबरचं आपल्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असते. अभिनेत्री आलिया गेल्या ५ वर्षांपासून रणबीर कपूरला डेट करत आहे. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. हे दोघे लग्न कधी करणार, याची प्रतीक्षा लागून राहिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांच्या लग्नाच्या तारखा समोर येत आहेत. पण, याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता हे लव्हबर्ड्स यावर्षी लग्नबंधनात अडकतील, असे वृत्त समोर आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -