कोकणवाडी भागात दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असताना काल संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन गटात दगडफेक, आणि तलवारी ने भांडण झाल्याची घटना घडली. भर रस्त्यात झालेल्या या भांडनावेळी लाठ्या, काठ्यांसहा लोखंडी सळई अन तलवारी उपासल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे औरंगाबाद शहरात काळ काही वेळ खबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोकणवाडी भागात बॅनर लावण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर दोन गटात लाठ्या
सह लोखंडी सळई ने राडा झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असताना शुक्रवारी संध्याकाळी चिशतीया चौकालगत असलेल्या एका प्रसिद्ध कपड्याच्या दलनासमोर अचानक दोन गट आपसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांवर दगड फेक करण्यात आली. शिवाय काही नशेत धुंद असलेल्या मदधुंदानी तलवारी उपसल्या आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. काही काळ परिसरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. लहान मोठ्या दुकानदारांनी भीतीने आपली दुकाने अर्धवट बंद केली होती. घटनेची माहिती प्राप्त होताच स्थानिक पोलीस आणि गुन्हेशाखेच्या पथकाने घटनस्थळी धाव घेतली मात्र तो पर्यंत टोळके फरार झाले होते. वृत्त देई पर्यंत या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली नसल्याने गुन्हा दाखल झालेला न्हवता.