पोटनिवडणूक असूनही अत्यंत चुरशीने प्रचार झालेल्या कोल्हापूर उत्तरमध्ये आज मतदान होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची मुदत ३ मे रोजी संपत असल्याने मोठा निर्णय घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते म्हणाले की, मतदान करणे हा सर्वांचा लोकशाहीचा अधिकार आहे आणि सगळ्यांनी करावे म्हणून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज कोल्हापूरला आलो. बराच विचार करून मतदान केले. मला सुद्धा ३० सेकंद लागले विचार करण्यासाठी, पण तरीही तो मोठा आनंद असतो. कितीही मोठा व्यक्ती असला, ज्यावेळी मतदान करतो तेव्हा विचारपूर्वक करतो.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटले की राजेंनी जे मराठा समाजासाठी अश्रू पाहिले. त्याचा वचपा येथील जनता काढेल. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. माझ्या सामाजिक चळवळींवर कोण त्याचा अर्थ कसा काढते हे मी काय करू शकत नाही मी सामान्य गरीब लोकांसाठी माझा लढा असतो. त्यातलाच एक भाग म्हणून उपोषण केलं होतं. त्यावर कुणी काय बोलावं आणि काय भूमिका घ्यावी ते मी काय सांगू शकत नाही.