ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएलमध्ये अखेर आज चेन्नई सुपर किंग्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा संपली. CSK ने RCB वर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताने चेन्नईने 216 धावा केल्या. RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावा केल्या. चेन्नईने रांगेत चार पराभव पाहिल्यानंतर आज त्यांना विजय मिळाला. आधी KKR, PBKS, LSG आणि SRH कडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पा चेन्नईच्या यंदाच्या सीजनमधल्या ) पहिल्या विजयाचे हिरो ठरले. शिवम दुबेने आज तुफान फटकेबाजी केली. त्याने 46 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि आठ षटकार होते. रॉबिन उथाप्पा संकटमोचक ठरला. त्याने बिनधास्तपणे फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने 50 चेंडूत 88 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि नऊ षटकार होते.