बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच विवाहबंधनात अडकले आहे. बॉलिवूडमध्ये सध्या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. त्यांच्या लग्नाचे विधी सुरु असून बुधवारी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा मेहंदी सोहळा पार पडला. कपूर आणि भट्ट परिवाराशिवाय इतर काही सेलिब्रिटींनीही मेहंदीला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्या मेहंदीचे फोटो व्हायरल होत आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 14 एप्रिल म्हणजे आज त्यांच्या लग्नाच्या विधीला सुरूवात होणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नासाठी पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. या विवाह सोहळ्यात कपूर कुटुंबाशी संबंधित जवळपास प्रत्येक सदस्य सहभागी झाला आहे. बुधवारी संध्याकाळी आलिया-रणबीरचा मेहंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याच्याशी संबंधित काही फोटो व्हायरल झाले आहेत. करिश्मा कपूरने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या मेहंदी सोहळ्यामधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत करिश्माने पायाला मेहंदी लावली आहे. करिश्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करिश्माने लिहिले, ‘मला मेहंदी आवडते.’ यासोबतच अभिनेत्रीने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.