Sunday, February 22, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! घोरपडीवर गँगरेप करुन तयार केला व्हिडिओ, 4 आरोपींना अटक

धक्कादायक! घोरपडीवर गँगरेप करुन तयार केला व्हिडिओ, 4 आरोपींना अटक

बंगाल मॉनिटर लिझार्ड म्हणजेच घोरपडीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ही घटना घडली आहे. गोठणे गावाजवळच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. विनापरवाना शस्त्रासह व्याघ्रप्रकल्पात घुसल्यानंतर आरोपींवर अटकेची कारवाई केली असता हा प्रकार उघडकीस आला. आरोपींचे मोबाइल तपासण्यात आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप तुकाराम, मंगेश पवार, जनार्दन कामतेकर आणि अक्षय सुनील अशी आरोपींची नावं आहेत. हे चारही आरोपी व्यवसायाने शिकारी आहेत. गोठाणे येथील गाभा परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये आरोपींनी पर्यटक म्हणून एन्ट्री घेतली होती. महाराष्ट्र वनविभागाने आरोपींचे मोबाईल ताब्यात घेऊन तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी घोरपडीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओ तयार केला होता.

दरम्यान, सह्याद्री फॉरेस्ट रिझर्व्हमध्ये तैनात असलेल्या वन अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून ते जंगलामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसत होते. हे चारही आरोपी कोकणातून कोल्हापूरच्या चांदोली गावामध्ये शिकार करण्यासाठी आले होते. या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली असून आता त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वन्य प्राण्यांचा जीव देखील धोक्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -