गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळी पुन्हा वाढ होऊ लागली आहे.सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पंचगंगा पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आहे.
पंचगंगा विहार मित्र मंडळाच्या बाजूने पंचगंगेचे पाणी बाहेर आले आहे. जिल्ह्यातील एकोणीस बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले
आज दुपारी ४.४४ वाजता गेट क्रं ४ओपन झाला (३४७.५४ फूट) असे एकूण चार गेट मधून विसर्ग सुरू आहे.
विसर्ग
१) गेट क्रं.३–१४२८
२) गेट क्रं. ६ –१४२८
३) गेट क्रं.५—१४२८
४) गेट क्रं. ४—१४२८
एकूण–५७१२
बि.ओ.टी.पाॅवर हाऊस मधून १४०० असा एकूण ७११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.