Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रधक्‍कादायक! दुकानात डांबून तरुणीवर अत्याचार

धक्‍कादायक! दुकानात डांबून तरुणीवर अत्याचार

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे हळदीच्या दुकानात डांबून एका तरुणीवर अत्याचार करण्‍यात आल्‍याची धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या तरुणांसह ६ जणांवर कुरूंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणी शहापूर येथे आली होती. वसीम कुरेशी या तरुणाने तिला शिरड शहापूर येथील हळदीच्या दुकानाच्या कार्यालयात डांबून ठेवून शिवीगाळ केली. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. नदीम शेख याने पीडित तरुणीच्‍या आई-वडिलांना ठार मारण्‍याची धमकी दिली. तसेच अन्‍य तिघांनी तिला शिवीगाळ केली. डांबून ठेवलेल्‍या दुकानातून पीडित तरुणीने सुटका करुन घेतली. घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्‍यांनी दिलेल्‍या तक्रारीनुसार, किल्लारी पोलिसांनी वसीम कुरेशी, नदीम शेख यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

घटना कुरूंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी हे प्रकरण कुरुंदा पोलिसांकडे वर्ग केले आहे. यावरून आज कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -