Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगधक्कादायक : युवतीवर अ‍ॅसिड हल्‍ला

धक्कादायक : युवतीवर अ‍ॅसिड हल्‍ला

प्रेमास नकार देणार्‍या युवतीवर अ‍ॅसिड हल्‍ला करण्यात आला. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव येथील सुंकदकट्टी बस स्थानकानजीक गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. अ‍ॅसिड हल्‍ला केल्यानंतर संशयित नागेश (वय 27) फरारी झाला.

या घटनेत युवतीचा गळा, पाठ आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. ती सुमारे 50 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संबंधित युवती एम. कॉम झाली आहे. नऊ महिन्यांपूर्वी ती येथील एका खासगी कंपनीत नोकरीला लागली होती. याआधी ती नागेशसोबत दुसर्‍या कंपनीत काम करत होती. तेथे त्यांचे प्रेम जुळले होते. त्यानंतर त्यांच्यात अचानक फूट पडली. त्यानंतर तो तिला धमकावत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -