ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचे सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांची आज जयंती (तारखेप्रमाणे) आहे. संभाजी राजे यांना शिवरायांचा छावा देखील संबोधले जाते. इंग्रजी कालदर्शिकेनुसार, 14 मे 1657 रोजी संभाजी राजे (शंभूराजे) यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे ते थोरले चिरंजीव. शंभूराजांची जयंती तिथीनुसार ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला देखील साजरी केली जाते.
संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. शिवरायांप्रमाणे शंभू राजेंनी देखील दैदिप्यमान, रणभूमीवर पराक्रम गाजवला होता. संभाजी राजे यांच्या जन्मोत्सवाचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही देखील मराठी शुभेच्छा कुटुंबीयांसह, मित्र मंडळी, आणि प्रियजनांना अस्सल मराठीत शुभेच्छा पाठवू शकतात.
ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाजा मजुरा….
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
पाहुनी शौर्य तुजपुढे
मृत्यूही नतमस्तक जाहला…
स्वराज्याच्या मातीसाठी
शंभू अमर जाहला…
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
तू अभिमान तू अभिमान,
सकल जनांचा तू अभिमान…
भगव्या रक्ताचा तू अभिमान…
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
श्रृंगार होता संस्काराचा
अंगार होता स्वराज्याचा
शत्रुही नतमस्तक होई जिथे
असा पूत्र आपल्या शिवरायांचा…
धर्मशास्रपंडित
ज्ञानकोविंद
सर्जा
रणधुरंदर
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनधिश्वर
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन!
मन असे ज्याचे कवी जैसे अलवार,
परी शत्रुसाठी सदैव हाती तळपती तलवार,
झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,
स्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,
शूर, वीर जसे सूर्याचे तेज साजे,
असा शोभे आपुला सिंहाचा छावा शंभुराजे
शंभुराजे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा!