Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगपेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय!

पेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासादायक असा एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतन म्हणजेच फॅमिली (pension) पेन्शच्या नियमात काही बदल करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या फॅमिली (pension) पेन्शनच्या काही नियमात सूट देण्यात आली आहे. या शिथिल केलेल्या नियमांबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली.


यानंतर आता जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील तसेच माओवादग्रस्त प्रदेश यांसारख्या दहशतवादग्रस्त भागात सेवा करणाऱ्यांच्या कुटुंबांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन आदेशानुसार, नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये समाविष्ट असलेला सरकारी कर्मचारी सेवेदरम्यान बेपत्ता झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतनाचे फायदे त्वरित दिले जातील आणि जर तो पुन्हा हजर झाला व पुन्हा सेवे रुजू झाल्यास कौटुंबिक निवृत्तीवेतन त्याच्या गहाळ कालावधीच्या दरम्यानच्या देण्यात आलेली रक्कम त्याच्या पगारातून त्यानुसार कापली जाऊ शकते.

यापूर्वी, बेपत्ता सरकारी कर्मचाऱ्याला कायद्यानुसार मृत घोषित करेपर्यंत किंवा तो बेपत्ता होऊन सात वर्षे पूर्ण होईपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाणार नसायचे असे कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या आदेशाचा संदर्भ देत मंत्री म्हणाले की यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, विशेषत: ज्या प्रदेशात सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्याची घटना वारंवार नोंदवली जाते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, हिंसाचारग्रस्त भागात काम करणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपहरणाची प्रकरणे समोर आली आहेत आणि त्यामुळे आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या व त्यांच्या कौटुंबिक हिताचे रक्षण करण्यासाठी पेन्शन नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -