ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबईतील अंधरीतील साकीनाका येथील एका महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी गुरुवारी डिंडोशी सेशन कोर्टाने (Dindoshi Sessions Court) नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. कोर्टाने 45 वर्षीय आरोपीला सोमवारी दोषी ठरवले होते. मोहन चौहान असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही घटना घडली होती. नराधमाने 34 वर्षीय महिलेवर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका वाहनात बलात्कार केला होता. त्यानंतर देखील नराधम थांबला नाही. त्याने महिलेची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या होत्या.
महिलेच्या गुप्तांगावर लोखंडी रॉडने वार…
नराधम मोहन चौहान यांनी महिलेवर बलात्कार करून तिच्यावर अमानवी अत्याचार देखील केले होते. त्याने पीडित महिलेच्या गुप्तांगावर लोखंडी रॉडने वार केले होते. त्यात पीडिता गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.




